Dapoli News – दापोली तालुक्यात किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश

दापोली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव व तालुका आरोग्य अधिकारी तसेच दापोली तालुक्यातील सर्व कीटकजन्य रोगांवर काम पाहणारे कर्मचारी यांच्या सजगतेने दापोली तालुक्यात किटकजन्य आजार प्रतिबंध अत्यंत योग्य पद्धतीने झाला आहे. हे हिवताप आरोग्य यंत्रणेचे खरे यश आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मचारी स्वप्निल जोशी हे आपल्या सहकारी कर्मचा-यांशी उत्तम संवाद ठेवला आहे. समन्वयाने दापोली तालुक्यात किटकजन्य आजार प्रतिबंधाकरिता आवश्यक ते उपाय योजना तसेच काळजी घेण्याचे आवाहन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी यांचे कडून गावात उत्तम रीतीने काम पार पाडत असल्यामुळे हे यश शक्य झाले आहे.

गावागावातील जनतेला जनजागृती करताना पाणी सात दिवसापेक्षा जास्त साठवून न ठेवणे, डबकी वाहती करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा ऑइल चा वापर करणे, पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरणे , पाणीसाठी व्यवस्थित कापडी बांधून झाकून ठेवणे यामुळे गावामध्ये उत्तम रीतीने जनजागृती होऊन ग्रामस्थांनाही याबाबतची सजगता निर्माण झाली आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या उत्तम व सखोल मार्गदर्शनामुळे कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे दापोली तालुक्यात हिवताप विभागाचे कौतुक केले जात आहे. दरवर्षी किटकजन्य संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे वाढणारी बाधीतांची संख्या यावेळी मात्र नियंत्रणात ठेवण्याचे उत्तम काम किटकजन्य रोगावर काम करणाऱ्या कर्मचा -यांनी केली आहे. हे या कर्मचा-यांचे यश म्हणावे लागेल.