चित्रपटात काम करण्याची एक तरी संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. बॉलीवूडमध्ये प्रवेश करून हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन लोक मुंबईत पोहोचतात. मात्र हा प्रवास सहज सोपा नसून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात बरेच लोक असे मार्ग देखील निवडतात ज्यामुळे त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागतेच. असाच एक यशाचा खडतर प्रवास एका अभिनेत्रीने शेअर केला होता.
हिंदी सिनेसृष्टीतील एक अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमीत तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. शर्लिनने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केलंय. मात्र चित्रपटात येण्यापूर्वी तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत शर्लिनने या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘बॉलीवूडमध्ये येण्याआधी माझी परिस्थिती फारशी बरी नव्हती. एकेकाळी गरिबीच्या काळात पैशासाठी मी लोकांसोबत झोपायची. अनेक वेळा लोकांनी माझ्याशी सशुल्क सेक्ससाठी संपर्क साधला. मात्र हे सगळ मी तेव्हा पैशासाठीही केले. हे विधान मी लोकांना माझी दया यावी यासाठी करत नाहीय. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही. असे ती म्हणाली होती.
शर्लिनला अजूनही काही लोक यासंदर्भात सोशल मीडियावर मेसेज करतात. त्यामुळे अभिनेत्रीने सार्वजनिकरित्या हे वक्तव्य केले होते. सध्या शर्लिन चोप्रा कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग नाही पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पापाराझीसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात.