Twice Born Baby: एकाच बाळाने आईच्या पोटातून दोनदा घेतला जन्म; डॉक्टरांच्या कृतीमुळे मिळाले जीवदान

कोणत्याही आईला आपले बाळ अगदी सुरक्षितपणे जन्माला यावे अशी सदिच्छा असते. काही गर्भवती स्त्रीयां एका बाळाला तर काही जुळ्या किंवा 3 बाळांना जन्म देतात. मात्र तुम्ही कधी ऐकले का एकाच गर्भवती महिलेने एकाच बाळाला दोन वेळा जन्म दिलाय. अशीच एक घटना इंग्लंडमध्ये घडली असून जगभरात तिची चर्चा सुरू आहे. लिसा कॉफी असे या 23 वर्षीय महिलेचे नाव असून तिने तिच्या प्रसुतीचा अनुभव सांगितला आहे.

लिसा कॉफी ही महिला इंग्लंडची रहिवाशी आहे. लिसानं सहाव्या महिन्यात आणि नवव्या महिन्यात आई होण्याचा अनुभव घेतलाय. लिसाला काही कारणामुळे सहाव्या महिन्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. सहाव्या महिन्यात जरी लिसाची प्रसुती झाली असली तरी बाळ मात्र अगदी यशस्वीरित्या काढण्यात आलं. पण लिसावर या बाळाचा जन्म होण्याआधी एक शस्त्रक्रीया झाली होती. ज्यामुळं बाळाचा मणका आणि पाठीचा कणा गर्भात योग्यरित्या विकसित झाला नव्हता. त्यामुळे बाळाच्या अवयवांमध्ये दोष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लिसाच्या बाळाची प्रकृती आणि इतर बाबी लक्षात घेता डॉक्टरांनी एक नवा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वीदेखील झाला. यावेळी बाळाला योग्यरित्या विकसित होण्यासाठी डॉक्टरांनी परत आईच्या गर्भात 38 आठवड्यांसाठी ठेवले. यानंतर पुन्हा नवव्या महिन्यात या बाळाचा जन्म झाला. आता हे बाळ सुदृढ आणि सुखरुप आहे.

लिसाने बाळाला सुखरूपपणे जन्म दिल्यावर तिच्या खडतर प्रवासाचा किस्सा सांगितला. ‘विज्ञानाच्या ताकदीनं हे बाळ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय जन्माला आलं. विशेष म्हणजे या बाळात आता कोणताही दोष नाही. जर तेंव्हाच बाळ जन्माला आलं असतं तर ते कधीच चालू शकले नसते. पण फिजिओथेरपी आणि जीवनरक्षक शस्त्रक्रीया केल्यानं त्याची गुंतागुंत दूर झाली.’ असे लिसा यावेळी म्हणाली आहे,. सध्या संपूर्ण जगात दोन वेळा जन्म घेणाऱ्या या बाळाची चर्चा होत आहे.