लग्न जुळवण्यासाठी वधू वर सुचक मंडळे असतात. यामध्ये लग्न जमत नसलेल्यांना आपला जोडीदार सोधण्याची सुवर्ण संधी असते. मात्र हेच लग्न मोडण्यासाठी आपल्याला न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र तुम्हाला माहित आहे का? लग्न असो वा कोणतेही नाते मोडण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पैसे दिले जातात. मग तो व्यक्ती आपल्या प्रियकरासोबत ब्रेकअप घडवून देतो.
ऑडिटी सेंट्रल वेबसाइटनुसार, स्पेनमध्ये अशी एक व्यक्ती अस्तित्वात आहे. ही व्यक्ती इ्तरांचे रिलेशन मोडण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेते आणि रिलेशन मोडून देते. अर्नेस्टो असे या व्यक्तीचे नाव आहे. स्पेनमध्ये ज्या व्यक्तीला आपले लग्न मोडायचे आहे किंवा ब्रेकअप करायचे आहे, तो अर्नेस्टोशी संपर्क साधतो. अर्नेस्टोचा हा एक व्यवसाय बनला आहे.
अर्नेस्टो अतिशय शिस्तबद्द पद्धतीने नातेसंबंध तोडण्याचा व्यवहार करतो. अर्नेस्टो या कामासाठी क्लाईंटकडून चांगली फी घेते आणि त्याच्या कामाची पूर्ण हमी देखील देते. लग्न मोडणे आणि ब्रेकअप करणे हे त्याचे आवडीचे काम आहे. त्यामुळे तो सध्या प्रकाश झोतात आला आहे.तसेच त्याचा व्यवसायही प्रचंड चर्चेत आला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे आपल्या कामाबद्दल सांगितले. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटनुसार, या कामासाठी अर्नेस्टो 550 यूएस डॉलर्स म्हणजेच 46,135 रुपये बेस फी आकारतो.
क्लाईंटला फक्त ठिकाण, वेळ आणि तारीख सांगायची असते. मग हे काम कसं पूर्ण करायचं हे माझ्यावर सोडा. असे आश्वासन तो त्यांच्या क्लाईंटला देतो. त्यामुळे लोक त्य़ांच्याकडे पूर्ण विश्वासाने जातात. लग्नाच्या सीझनमध्ये त्याच्याकडे इतच्या तक्रारी येतात की त्याला ओव्हरटाईम करावा लागतो. अशी माहिती त्याने स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.