गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा; संजय राऊत यांनी मिधेंना टोलवले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील घटकपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीतील जागावाटप लोकसभेतील ‘स्ट्राइक रेट’ आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा असल्याचा टोला मिंधेंना लगावला.

सोमवारी सकाळी माध्यमांनी याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, यांचा कसला आलाय स्ट्राईक रेट. गद्दारी, लुटमारी, भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याच्या बाबतीत यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे. कामाच्या बाबतीत यांचा स्ट्राईक रेट काय आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेचे राज्याचे मोठे ढोल वाजवले जात आहेत. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी जमशेदपूरमध्ये होते. तिथे त्यांनी झारखंड सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टिप्पणी केली. पंतप्रधानांनी यावर टीका करताना अशा योजना बोगल, भंपक आणि बिनकामाच्या असल्याचे म्हटले. याचा अर्थ दुसऱ्या राज्यात कुणी लाडक्या बहिणीसाठी काम केले करत ते बोगस, भंपक आणि फसवणूक. मग तोच न्याय महाराष्ट्रातही लावला पाहिजे. मिधेंचे सरकारही तेच करत आहे. हे डबल स्टँडर्डचे लोक आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.

“भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, हिम्मत असेल तर…”, संजय राऊत यांचं थेट आव्हान

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत एक बंगला देण्यात आल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, फडणवीस जिकडे जातायंत तिकडे त्यांना बंगला अलॉट होतोय. त्यांचे आणि बंगल्यांचे काय रहस्य आहे कळत नाही. महाराष्ट्रात मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो, पण इथे त्यांनी तीन-तीन बंगले घेतले आहेत. पण या बंगल्याचे भूत बंगले होणार असून निवडणुका हरल्यावर भूतासारखे फिरत रहावे लागणार आहे.

फडणवीसांची महाराष्ट्रातून गच्छंती निश्चित, भाजपने दिल्लीत बंगला अलॉट केला