मजुरीचे दोनशे रुपये वाढवून दिले नाही म्हणून मजुराने हातोड्याचे घाव घालून मुकादमाला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल रहमान असे मुकादमाचे नाव असून त्याने पश्चिम बंगाल येथून तीन कामगारांना 900 रुपये हजेरीवर बोलावले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मजूर सलीम शेख याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अंबरनाथमधील दत्त साईकृपा इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम सुरू असून त्या इमारतीच्या बांधकामाचा ठेका काम सुरू असून त्या देण्यात आला काम साईडेकर मजूर कमी पडत असल्याने त्याने तीन मजूर पश्चिम बंगाल येथून बोलावले. रहमान याने त्या मजुरांना 900 रुपये हजेरी देण्याची कबुली दिली. पूर्ण दिवस काम केल्यानंतर हजेरी देण्याची वेळ आली तेव्हा रहमानने मजुरांच्या हातात फक्त 700रुपये टेकवले आणि उद्या परत या असे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून मजूर सलीम शेख याने रहमानसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. केवळ 200 रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अखेर संतापलेल्या सलिमने साईडवर असलेल्या हातोड्याने रहमानच्या डोक्यात घाव घातला. या हल्ल्यात रहमानला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.