मराठा आरक्षणासाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी घोषणा करताच मिंधे सरकारने त्यांची मनधरणी करण्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांना पाठवले. मात्र जरांगे यांनी त्यांची विनवणी धुडकावली. मराठा समाजाची नाराजी सरकारला परवडणार नाही, असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिला.