महत्वाचे काम आहे सांगून महिलेला लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अहमदपूर तालुक्यात घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलिसात अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडित महिला 12 सप्टेंबर रोजी अनुदानावर शिलाई मशिनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अहमदपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर थांबली होती. यावेळी गावातील एक ओळखीचा इसम तिच्याजवळ आला आणि महत्वाचे काम आहे सांगून लॉजवर चल सांगू लागला. मात्र महिलेने लॉजवर जाण्यास नकार देत येथेच बोल असे सांगितले. परंतु आरोपीने अतिमहत्वाचे काम आहे सांगून महिलेला लॉजवर घेऊन गेला.
महिलेचे आधारकार्ड दाखवून लॉजवर रुम घेतली. रुममध्ये गेल्यानंतर आरोपीने महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे सांगितले. महिलेने नकार देताच तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तुला काय करायचे ते कर म्हणून तेथून पळून गेला. यानंतर महिलेने अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 64 बि.एन सह कलम 3 (1) (w) (1) (2), 3 (2)(v) नुसार अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर करीत आहेत.