राजकारणासाठी फिल्म इंडस्ट्रीला राम राम

अभिनेता विजयच्या अखेरच्या चित्रपटाची घोषणा, 2026 मध्ये निवडणूक लढवणार तामिळ सुपरस्टार थलपथी विजय आपल्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपली चित्रपट कारकीर्द सोडण्याच्या तयारीत आहे. अशातच शनिवारी संध्याकाळी केव्हीएन प्रॉडक्शनने विजयचा शेवटच्या चित्रपट ‘विजय 69’ शी संबंधित अपडेट शेअर केली. या चित्रपटात विजय लोकशाहीसाठी लढताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मेकर्सनी शेअर केले पोस्टर

चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विजयचा चेहरा न दाखवता त्याच्या हिट चित्रपटांमधील एका दृश्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

30 वर्षांपासून मनोरंजन केल्याबद्दल आभार

मेकर्सनी चित्रपटाची घोषणा करताना लिहिलंय, हा आमचा पहिला तामिळ चित्रपट असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा एक उत्सव आहे. थलपथीबद्दल प्रेम. आम्ही सर्व तुमच्या चित्रपटांसह मोठे झालो आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आमच्या जीवनाचा एक भाग आहात. 30 वर्षांहून अधिक काळ आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.