धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दसवेल जंक्शन येथे पिकअप ट्रक आणि इको व्हॅनमध्ये अपघात झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी हिरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
इको व्हॅनमधील सर्व प्रवासी वारुळ गावातील धार्मिक कार्यक्रमाहून घरी परतत होते. यावेळी भरधाव पिकअप ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातावेळी पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात पिकअप चालक दीपक हा किरकोळ जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.