पानगाव ते खरोळाफाटा या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु करावे या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. यास समर्थन करत मोहगाव (ता.रेणापूर) येथील ग्रामस्थांनी रविवारी (ता.15 ) खरोळाफाटा येथे अकरा ते एक वाजण्याच्या दरम्यान दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
15 आॕगस्ट पासून खरोळाफाटा येथे रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करावे या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. शनिवारी (ता.15) आंदोलनाचा 30वा दिवस आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे मोहगाव ग्रामस्थांच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता कोरे यांनी यांनी रास्ता रोको ठिकाणी येत निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.