स्टेजसमोर बसला होता, उडी मारत व्यासपीठावर मुख्यमंत्र्यासमोर उभा ठाकला; वाचा काय झाले नमके….

बंगळुरू येथे लोकशाही दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर एका व्यक्तीने अचानक उडी मारल्याने प्रचंड खळबळ उडाली. मुख्यंमंत्री सिद्धरामय्या स्टेजवर बसलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्याला थांबवले, व त्याला स्टेजवरून खाली उतरवण्यात आले. या घटनेनंतर लगेचच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आणि पुढील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आला.