आधार अपडेटची मुदत वाढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही डेडलाईन वाढवण्यात आली होती. सर्वात पहिले 14 मार्चची डेडलाईन वाढवून 14 जून, त्यानंतर 14 जूनची डेडलाईन 14 सप्टेंबर आणि आता 14 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे.
10 वर्षांपूर्वी काढलेले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी यूआयडीएआयने युजर्संना मोठा दिलासा दिला आहे. जुने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 सप्टेंबरला संपणार होती. परंतु यूआयडीएआयने ही मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 डेडलाईन देण्यात आली आहे. 14 डिसेंबरपर्यंत युजर्स कोणतेही शुल्क न देता आपले आधार अपडेट करू शकतात.
कार्ड कसे अपडेट कराल
सर्वात आधी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
‘माय आधार’वर क्लिक करा. अपडेट यूअर आधार निवडा.
अपडेट आधार डिटेल्सवर जा. डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा.
आधार यूआयडी नंबर, कॅपचा कोड टाका. ओटीपीवर क्लिक करा.
ओटीपी टाकून लॉगईन करा.
माहिती अपडेट करायची ती करून एन्टर करा.
आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. नंतर सबमीटवर क्लिक करा.
ऑनलाईन सोबत ऑफलाईन आधार अपटेड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.