Hockey Asian Champions trophy 2024 मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील पाचवा विजय साजरा केला. टीम इंडियाने पाकिस्तानचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. मात्र या सामन्यात दोन्ही देशांचे खेळाडू आपापसात भिडल्याने वातावरण तापले होते.
पाकिस्तानने सुरुवातीला गोल करत सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दमदार पुनरागमन करत दोन गोल केले आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्या दरम्यान, चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या राणा वहीद अशरफने टीम इंडियाच्या जुगराल सिंह याला धोकादायक पद्धतीने टॅकल केले. त्यामुळे जुगराल मैदानावर कोसळला. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू चांगलेच संतापले आणि दोन्ही संघ मैदानातच आपापसात भिडले. शेवटी पंचांनी मध्यस्थी करत दोन्ही संघांना बाजूला केली आणि व्हिडिओ पंचाना निर्णय घेण्यासाठी पाचारण केले. व्हिडिओ पंचांनी दिलेल्या निर्णयानुसार राणा वहीद अशरफला यलो कार्ड दाखवत 10 मिनिटांसाठी मैदानाबाहेर पाठवले.
या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी दोन्ही दोन्ही संघ सेमीफायलनमध्ये आपली जागा पक्की करण्यात यशस्वी ठरले आहेत. 16 सप्टेंबर रोजी सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कोरियाविरुद्ध खेळेल, तर पाकिस्तानचा सामना चीनविरुद्ध होणार आहे.