श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात एका तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अपहरण करणाऱ्याचा श्रीरामपूर तालुका ठाण्याचे पोलीस शोध घेत होते.अपहरण करणारा पोलिसांच्या हाथी लागला. मात्र, मुलाबाबत तो माहिती देण्याचे टाळीत होता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मुलाचा खुन केल्याची कबुली दिली. मात्र, मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहिती देण्याऐवजी तो पोलिसांची दिशाभूल करत होता. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नांनी पाच दिवसानंतर त्या तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह वैजापुर तालुक्यातील गारद परिसरात मक्याच्या शेतातुन शोधून काढला.
पत्नी नांदायला येत नाही म्हणून आरोपीने मेहुण्याच्या मुलाचा गळा आवळून खुन केला होता. आरोपीने पोलिसांची दिशाभुल करीत असल्याने याचे गूढ वाढत होते. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. मात्र, मुलाच्या मृतदेहाची माहिती आरोपी देत नव्हता. तो पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र, अखेर त्या तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह श्रीरामपूर पोलिसांनी पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर वैजापुर तालुक्यातील गारद परिसरात मक्याच्या शेतातुन शोधून काढला.
वरिष्ठांच्या आदेशाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पो.हे.कॉ. राजेंद्र त्रिभुवन,पो. कॉ. चांद पठाण यांच्यासह पोलिस कर्मचारी आरोपी राहुल पोपट बोधक (रा. चांदेगाव ता. वैजापूर) याला ताब्यात घेण्यासाठी वैजापुरकडे गेले. आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि ठिकठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता आरोपी शिवर बंगला (ता. वैजापूर) हद्दीत असल्याची माहिती मिळाली. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने मोबाईल एका झुडपात टाकुन दिला होता. त्यामुळे आरोपीचा शोध लागत नव्हता. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घराजवळ रात्रभर दबा धरुन बसले होते. आरोपी घरी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीची अपहरण केलेल्या मुलाची चौकशी केली असता शिवर बंगला ते बटना आवरा या भागातील मक्याच्या शेतात मृतदेह फेकला आहे, असे आरोपीने सांगितले. पोलिसांच्या पथकाने या भागातील 20 किलोमीटर परिसरात येणाऱ्या मक्याच्या शेतात शोध घेतला. मात्र, मुलाचा मृतदेह सापडला नाही. सलग तीन ते चार दिवस मक्याच्या शेतात मृतदेहाचा शोध घेतला. परंतू पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आरोपी दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटिव्ही फुटेज तपासले. आरोपी आणि अपहरण झालेला मुलगा शिऊर बंगला चौकातील पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आला. पोलिस पथकाने त्या ठिकाणापासुन विरुद्ध दिशेने तपात सुरु केला. शिऊर बंगला ते संभाजीनगर जाणाऱ्या रोडने गारद या भागापर्यंत अपहरण झालेला मुलगा आरोपीसोबत सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत होता. आरोपीने अपहरण केलेल्या मुलाचा गारद शिवारात खुन केल्याचा अंदाज बांधुन त्या दिशेने तपास सुरु केला. गारद (ता.वैजापुर) शिवरात गळा दाबून मृतदेह टाकुन देण्यात आला. मृतदेह पोलिसांना सापडल्यानंतर राहुल पोपट बोधक याच्याविरोधात खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग बसवराज शिवपूजे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हे. कॉ. राजू त्रिभुवन पो. कॉ. चांद पठाण यांच्यासह पोलीस पथकाने गुन्हा उघडकीस आणला.