एकही चेंडू न टाकताच कसोटी संपली

ग्रेटर नोएडावर खेळविण्यात आलेला अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना एकाही चेंडूचा खेळ न होताच रद्द करण्यात आला. खराब हवामान आणि ओली खेळपट्टी आणि मैदानातील व्यवस्थानपातील त्रुटींमुळे कसोटीच्या पाचही दिवसांत एकही चेंडू न फेकता हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघ उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानने 1933 मध्ये प्रथम मुंबई जिमखान्यावर कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. त्यानंतर प्रथमच हिंदुस्थानात एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाल्याचा प्रकार घडला आहे.

अफगाणिस्तानमध्ये सामन्यांचे आयोजन करता येत नसल्याने यजमान अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना खेळण्यास हिंदुस्थानातील ग्रेटर नोएडा मैदानाला पसंती दिली होती. 9 ते 13 सप्टेंबर या कालावधीत या सामना खेळविला जाणार होता, मात्र पहिल्याच दिवशी पाऊस पडल्याने सामना सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर सतत होणाऱ्या पावसामुळे मैदान सुकण्यास अनेक अडचणी येत होत्या. मैदानातील ड्रेनेज सिस्टम कमकुवत असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता.