अॅपल कंपनीने 9 सप्टेंबरला इट्स ग्लोटाइम या इव्हेंटमध्ये आपली नवीन आयफोन 16 सीरिज लाँच केली होती. कंपनीने शुक्रवारपासून आयफोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात केली आहे. कंपनीने 16 सीरिजअंतर्गत आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे चार फोन लाँच केले होते. तसेच कंपनीने या सीरिजशिवाय अॅपल वॉच सीरिज 10 आणि एअरपॉड्स 4 सुद्धा लाँच केले होते. आयफोन 16 सीरिजचे फोन हिंदुस्थानशिवाय जवळपास 50 देशांत प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
– आयफोन 16 – 79,900 रुपये (128 जीबी) 89,900 रुपये (256 जीबी), 1,09,900 (512 जीबी)
– आयफोन 16 प्लस – 89,900 रुपये (128 जीबी), 99,900 रुपये (256 जीबी), 1,11,900 रुपये (512 जीबी)
– आयफोन 16 प्रो – 1,19,900 रुपये (128 जीबी), 1,44,900 रुपये (256 जीबी), 1,64,900 रुपये (512 जीबी), 1,84,900 रुपये (1 टीबी)
– आयफोन 16 प्रो मॅक्स – 1,29,900 रुपये (256 जीबी), 1,49,900 रुपये (512 जीबी), 1,69,900 रुपये (1 टीबी)