घर किंवा ऑफिसमध्ये आपण व्हॅक्युम क्लिनर बघतो. हे एक इलेक्ट्रिक उपकरण असून त्याचा उपयोग धूळ-माती साफ करण्यासाठी होतो. अनेक पंपन्यांचे व्हॅक्युम क्लिनर मार्पेटमध्ये आहेत, पण एका 23 वर्षांच्या युवकाने एक हटके व्हॅक्युम क्लिनर तयार केलाय. तपाला नादमुनी असे युवकाचे नाव असून त्याने जगातील सर्वात लहान व्हॅक्युम क्लिनर बनवून विश्वविक्रम केलाय. त्याचा आकार फक्त 0.65 सेंमी (0.25 इंच) आहे. म्हणजे नखांपेक्षाही लहान. या व्हॅक्युम क्लिनरची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेका@र्डमध्ये नोंद झालीय. तीही एकदा नव्हे दोनदा. तपाला नादमुनी या मुलाने 2020 सालीही 1.76 सेमीचा व्हॅक्युम क्लिनर बनवला होता. जेव्हा याचा गिनीज रेका@र्ड दुसऱयाने मोडला, तेव्हा नादमुनीने पुन्हा प्रयत्न केला.