मोठी बातमी: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; 6 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार

कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सहा महिन्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने, सीबीआयने केलेली अटक वैध असल्याचे सांगताना, दीर्घकाळ तुरुंगवास म्हणजे ‘स्वातंत्र्यापासून अन्यायकारकरित्या वंचित ठेवण्याचे प्रमाण’ असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

आप नेते मनीष सिसोदिया, संजय सिंग, विजय नायर आणि भारत राष्ट्र समितीच्या के कविता यांच्यानंतर केजरीवाल हे या खटल्यातून तुरुंगातून बाहेर पडणारे चौथे हाय-प्रोफाइल नेते ठरले आहेत.