सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे पंतप्रधान मोदींनी घेतले दर्शन, गांधी टोपी घालून केली आरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी हजेरी लावली. चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे मोदी यांनी दर्शन घेतले. तसेच गांधी टोपी घालून आरतीही केली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गणपती बसला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरी भेट दिली. चंद्रचूड यांच्या निवास्थानी बसलेल्या गणपतीचे पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांनी मराठमोळ्या पद्धतीने आरतीही केली. भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.