मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून नेरळ येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत थोरवे यांचा बॉडिगार्ड असलेला शिवा नावाचा व्यक्ती एका कारमधील व्यक्तीला हातातील दांड्याने मारहाण करताना दिसत आहे. त्यावरून सध्या मिंधे गटावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून या राज्यात कायद्याचा धाक राहिला की नाही असा सवाल जनतेकडून केला जात आहे.
गृहमंत्री फडणवीस,
हे दृष्य पाहून तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
काय अवस्था केलीय तुम्ही या महान राज्याची?@Dev_Fadnavis @AmitShah @UNHumanRights @DGPMaharashtra @mieknathshinde @iambadasdanve @VijayWadettiwar https://t.co/N9jpNCLrFX— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2024
या घटनेचा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. ”गृहमंत्री फडणवीस, हे दृष्य पाहून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काय अवस्था केलीय तुम्ही या महान राज्याची?”, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्या सोशल मीडियावर मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा याचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवा हा एका कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला दांडक्याने बेदम मारहाण करत आहे. त्यावेळी गाडीत त्या व्यक्तीची बायको व मुलं देखील होती व त्यांचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज देखील ऐकू येत आहेत.