फोन की टॅब्लेट? पेपरसारखा फोल्ड होणाऱ्या या फोनची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल

तुम्ही फोल्ड होणारे अनेक फोन पाहिले असतील. पण वृत्तपत्रासारखा घडी करता येणारा फोन पाहिला आहे का? हुवावे कंपनीने असा फोन बाजारात आणला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या घड्या उघडल्यानंतर या फोनचा वापर टॅबसारखा करता येतो. याची किंमंत ऐकून तुम्ही चक्रावून जाल.

काय आहेत फीचर्स? 

Huawei Mate XT Ultimate Triple Folding Smartphone मध्ये तीन कॅमेरे आहेत. त्यातला प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सल आहे. दुसरा 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड असून तिसरा कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,600mAh क्षमतेची बॅटरी असून 50W वायरलेस चार्जरही मिळतो. या फोनमध्ये 5G असून या फोनचे वजन 298 ग्रॅम आहे. या फोन मध्ये 16 GB चा रॅम असून त्याची मेमरी 1TB इतकी आहे.

फोनची किंमत

या फोनची किंमत चीनमध्ये 19 हजार 999 युआन इतकी आहे. म्हणजेत हिंदुस्थानी रुपयांमध्ये हा फोन 2 लाख 35 हजार 900 रुपयांना मिळू शकतो.