![well](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/09/well-696x447.jpg)
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने तीन जणांचा दबून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. मृत्यू झालेले तिघेही एकाच कुटुंबातील असून दोघे अल्पवयीन आहेत. किशन सिंह, विक्की उर्फ विकास आणि राहुल अशी ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
राजस्थानमधील दांता रामगढच्या राजनपुरा गावात ही घटना घडली. किशन सिंह हे आपल्या दोन पुतण्यांसह विहिरीचे खोदकाम करत होते. खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळला. यामुळे तिघेही जण मातीच्या ढिगाऱ्याखाळी दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. तिघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर तिघांचेही मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.