धारावीच्या पुर्नविकासाची जबाबदारी सरकारने अदानी समुहाला दिली होती. आज या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. पण स्थानिकांनी या भूमिपूजनाला जोरदार विरोध केला. त्यामुळे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेडने हा कार्यक्रम रद्द केला आहे.
धारावी पुर्नविकासासाठी माटुंगा येथील आरपीएफ मैदानात आज भूमिपूजन होणार होतं. त्यामुळे धारावीकरांनी संताप व्यक्त केला होता. पुर्नविकास करणारी डीआरपीपीएल कंपनीने विकासाची कुठलीही ब्ल्यु प्रिंट जाहीर केली नाही. त्यामुळे डीआरपीपीएल भूमिपूजनाचा कार्यक्रम कसे करू शकताता असा संतप्त सवाल धारावीकरांनी विचारला होता. जर आज भूमिपूजन झाले तर हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा स्थानिकांनी दिला होता. त्यामुळे डीआरपीपीएल भूमिपूजनाचा आजचा कार्यक्रम रद्द केला.