Ganeshotsav 2024 ‘चंद्रपूरचा राजा’साठी बनवला शिशमहाल, केलं 21 किलो चांदीचे दान, पाहा व्हिडीओ

>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

‘चंद्रपूरचा राजा’ अशी ओळख असलेल्या जटपुरा युवक गणेश मंडळाच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच रांगा लागल्या आहेत. यंदा या मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या गणेश मंडपाच्या बाह्यभागात राजस्थानी कलाकारांनी साकारलेली भव्य स्वागत कमान असून आतल्या भागात शिशमहाल साकारण्यात आला आहे. मनोहारी, रत्नजडित व विविध आयुधांनी युक्त अशी 21 फुटी ‘महाकाय’मूर्ती गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव काळात दर दिवशी ही मूर्ती नव्या रुपात दर्शन देत असते.

विशेष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बाप्पाला गणेश भक्तांनी 21 किलो चांदी अर्पण केली आहे. दिवस -रात्र या मूर्तीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा लागल्या असून दर्शन घेण्यासाठी दूरवरून गणेश भक्त मंडपात येत आहेत. जटपुरा युवक गणेश मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवा करत असतात.

जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांनी सामनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.