मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली; टिटवाळ्याजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड

मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. टिटवाळ्याजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. सोमवारी हार्बर मार्गावर नेरूळ स्थानकात ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक बिघाडाने सोमवारी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले होते. आता मंगळवारी मध्य रेल्वेवरील वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

टिटवाळ्याजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.