पाकिस्तानविरुद्ध बेन स्टोक्स कर्णधार

ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्या मालिकेसाठी इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे पुन्हा सोपविण्यात आले आहे.  नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तो मांड्याचे स्नायू दुखावल्यामुळे या मालिकेत खेळू शकला नव्हता. इंग्लंडने मालिकेसाठी संघ जाहीर केला असला तरी पाकिस्तान अद्याप या सामन्यांचे ठिकाण जाहीर केलेले नाहीत.