एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने आज इतिहास घडवला. स्पेसएक्सने पोलारिस डॉन मिशन यशस्वी लाँच केले. हे मिशन आज दुपारी 1 वाजता लाँच होणार होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे दोन तास पुढे ढकलले. अखेर चारच्या सुमारास या मिशनने यशस्वी उड्डाण केले. पोलारिस डॉन मिशनमध्ये चार अंतराळवीर पृथ्वीपासून 700 किलोमीटरवर अंतराळात स्पेसवॉक करणार असून हा जगातील पहिला खासगी स्पेसवॉक असणार आहे. ही मोहीम 5 दिवसांची असणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळवीर ज्या कक्षेत जाणार आहेत त्या कक्षेला गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही अंतराळवीराने भेट दिलेली नाही. दोन अंतराळवीर प्रथम खासगी स्पेसवॉक करतील. यावेळी ते स्पेसएक्सने विकसित केलेला ईव्हीए सूट परिधान करणार आहेत. ही मोहीम याआधी 27 ऑगस्टला प्रक्षेपित होणार होती. परंतु, हेलियम गळती आणि खराब हवामानामुळे ही मोहीम पुढे ढकलावी लागली होती.
मानवी आरोग्याशी संबंधित प्रयोग
या मोहिमेदरम्यान मानवी आरोग्याशी संबंधित 36 संशोधन अभ्यास आणि प्रयोगही केले जाणार आहेत. याशिवाय स्टारलिंकच्या लेझरवर आधारित कम्युनिकेशनची अवकाशात चाचणी घेतली जाणार आहे