महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र या अधिकारीपदी मोनिका बाळासाहेब झरेकर ही राज्यात दुसरी आली आहे. मोनिका झरेकर ही खातगाव टाकळी (ता.नगर) येथील रहिवासी आहे. तसेच नौदलातील अधिकारी बाळासाहेब झरेकर यांची कन्या आहे. तिची यापूर्वी राज्य करनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय) या पदांसाठी सुद्धा निवड झाली होती. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बबनराव झरेकर यांची पुतणी, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सेवानिवृत्त) सुरेश शिंदे यांची भाची आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.