भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री करणार नाहीत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच सल्ला देण्यासाठी अजित पवारांनी एक टीम ठेवली आहे. ही टीम जो सल्ला देते तसे अजित दादा ऐकतात.
अजित पवारांनी बिहार पॅटर्न प्रमाणे भाजपकडे मुख्यमंत्रीपद मागितल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की भाजपकडे मुख्यमंत्रिपद मागण्याची त्यांची पोझिशन नाही, भाजपही त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत असे जयंत पाटील म्हणाले.
गेल्या काही दिवसात अजित पवार बदललेले दिसत आहेत असेही जयंत पवार म्हणाले. तसेच अजित पवारांना सल्ला देण्यासाठी एक टीम नेमली आहे. पूर्वी अजित पवारांनी एकदा विधान केलं तर केलं. आता अजित पवार चुक मान्य करत आहेत. अजित पवारांनी आपला मूळ स्वभाव दाखवू नये असा सल्ला त्यांना दिला असावा असेही जयंत पाटील म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी नागपूर येथे आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी मांडलेले ठळक मुद्दे. pic.twitter.com/Cs40Sypeew
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 10, 2024