शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या जडणघडणीत आप्पा साळवी यांचे महत्वाचे योगदान होते. सर्वप्रथम ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. त्यानंतर 1990 च्या काळात ते रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख होते. 1995 ला राजापूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवड आले. 1995 ते 1999 ते आमदार होते.
सोमवारी आप्पा साळवींची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत माळवली. आप्पा साळवी हे राजकारणातले अनेकांचे मार्गदर्शक होते.