
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पुढील सर्व दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.’
नमस्कार,
माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख आपणांस नक्की…— Supriya Sule (@supriya_sule) September 9, 2024
”माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख आपणांस नक्की कळविली जाईल”, असे त्यांनी ट्विट केले आहे.