बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर करण्यात आला असून आपल्या पदार्पणीय मालिकेत अपयशी ठरलेला रजत पाटीदार आणि पदार्पणातच 65 धावांची खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला संघातून वगळण्यात आले आहे. मात्र 16 सदस्यीय संघात विराट कोहली, के. एल. राहुल व ऋषभ पंत या स्टार खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे.
या मालिकेत पदार्पण करणारे सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाशदीप हे संघात कायम आहेत. हिंदुस्थान इंग्लंडविरुद्ध आपली पाच कसोटींची मालिका खेळला होता आणि त्यात 4-1 बाजी मारली होती. त्या संघातील बहुतांश खेळाडू संघात कायम असून विराट कोहली, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत पुन्हा संघात घेण्यात आले आहे. यश दयाल वगळता तिन्ही खेळाडूंनी यंदा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले. दयालने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत 4 विकेट टिपले आहेत.
दुलीप ट्रॉफी न खेळलेल्या सहा वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळाले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. कोहली वगळता पाचही खेळाडूंनी या वर्षी फेब्रुकारी-मार्चमध्ये इंग्लंडकिरुद्ध कसोटी मालिका खेळली होती.
बांगलादेशचा संघ हिंदुस्थान दौऱ्याकर दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नईत तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. 6, 9 आणि 12 ऑक्टोबर रोजी 3 टी-20 सामने खेळवले जातील. हे सामने अनुक्रमे ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबाद येथे होणार आहेत.
पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुक जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, यश दयाल.