उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिह्यातील अनेक गावांच्या बाहेर गैर-हिंदू फेरीवाले आणि रोहिंग्या मुस्लिमांना प्रवेश बंदी आहे, असे फलक लावण्यात आले आहेत. काही गावांमध्ये लावलेले अशा प्रकारचे फलक आम्ही काढले आहेत. हे फलक लावणाऱयांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे रुद्रप्रयागचे पोलीस अधीक्षक प्रबोधकुमार घिलडीयाल यांनी सांगितले.