1999 साली हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होते. या या युद्धात आपलाही सहभाग होता अशी जाहीर कबुली पाकिस्तानने पहिल्यांदा २५ वर्षात दिली आहे. शुक्रवारी पाकिस्तानात संरक्षण दिवस साजरा केला गेला. तेव्हा सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी भाषणात म्हटलं की हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान 1948, 1965, 1971, कारगिल आणि सियाचीनमध्ये झालेल्या संघर्षात हजारो लोकांनी आपले बलिदान दिले आहे.
1999 साली मे आणि जून दरम्यान कारगिलमध्ये हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान युद्ध झालं होतं. पाकिस्तानी सैन्याने जम्मू कश्मीरमधल्या कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. हिंदुस्थानने .घुसखोरांना पळवून लावलं होतं.
तेव्हा पाकिस्ताने हे सैनिक आपले असल्याचा इन्कार केला होता. हे लोक स्वतंत्र काश्मीरसाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक असल्याचे म्हटले होते. इतकंच नाही तर कारगिलमधील घुसखोरीचाही त्यांनी दावा फेटाळला होता.