अहमदपूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मयत पत्नीच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल चालक उमाकांत सायस कराड रा.पार ता.अहमदपूर हा स्वतःच्या मोटार सायकलने किनगाव कडे निष्काळजीपणे व भरधाव वेगात गाडी चालवत येत होता. यावेळी मयत रवी वाल्मीक तांदळे (वय 36) रा चिखली ता.अहमदपूर हा स्वतःच्या मोटरसायकलचे गॅरेज वरून काम करून सावरकर चौकाकडे जात होता. तेव्हाच मयत रवी वाल्मीक यांच्या गाडीला उमाकांत यांनी पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात रवि तांदळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ प्राथमिक उपचार घेऊन शासकिय रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रविवारी (1 सप्टेंबर) दुपारी रवि यांचा मृत्यू झाला. त्यानंत मयत रवी तांदळे यांची पत्नी मनीषा रवी तांदळे यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी (6 सप्टेंबर) रोजी उमाकांत कराडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड हे करीत आहेत.