वंदे भारत चालवण्यावरून लोको पायलटमध्येच मारहाण, कपडे फाडले

वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यावरून दोन लोकोपायलटमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही लोकोपायलटमध्ये हाणामारी झाली. यात कपडेही फाडले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या जयपूरहून आग्रापर्यंत वंदेभारत ही ट्रेन धावते. दोन सप्टेंबरला सुरु झालेली ही ट्रेन आठवड्यातून तीन वेळा धावते. आग्रा मंडलचे कर्मचारी ट्रेनचा ताबा घेण्यासाठी पोहोचले. पण अजमेर मंडलने गाडीचा ताबा दिलाच नाही. ट्रेन आग्रा केंटमध्ये पोहोचली तेव्हा युनियनचे शेकडो कार्यकर्ते स्टेशनवर पोहोचले आणि धक्काबुक्की सुरू केली. इथून आग्रा मंडलचे कर्मचारी गंगापूर शहरात पोहोचताच आग्र्याच्या यूनियन कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. ही घटना ताजी असताना गुरुवारी असाच प्रकार झाला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग्रा केंटकडून वंदे भारत ट्रेन गंगापूर शहरात पोहोचली, तेव्हा परत युनियनच्या कर्मचाऱ्यांशी भांडणं झाली. याचवेळी आग्रा मंडलचे ट्रेनच्या व्यवस्थापांचा शर्ट फाडला गेला. दोन्ही लोको पायलटला ट्रेनमधून जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले.

कारण आले समोर

कुठलीही नवीन ट्रेसर जेव्हा सुरू होते तेव्हा ही ट्रेन ज्या लोकोपायलटला संधी मिळते त्याची बढती होते. इतकंच नाही तर नव्या भरतीमध्ये संधीही मिळते. वंदे भारत एक्सप्रेस कोण चालवणार यातूनच दोन मंडलांचा वाद झाला. आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.