मुंबई गोवा महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यामुळे होत असलेली प्रचंड वाहतूककोंडी, मुंगीच्या वेगाने चालणारी वाहने याचा सामना करत कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निघालेल्या गणेशभक्तांना आज आणखी एका अडचणीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महाड येथील पेट्रोलपंपावर सीएनजी अचानक संपला, परिणामी या पेट्रोलपंपाबाहेर एसटी आणि इतर सीएनजीवरील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
चाकरमान्यांना अनेक तास या ठिकाणी अडकून पडावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी सरकारच्याविरोधात घोषणाचाजी करत रोष व्यक्त केला. येथे सीएनजी पंप आहे. केवळ महाक एसटी आगाराचा विचार केला असत पंचेचाळीस सीएनजी बस, आठ डिझेलच्या तर पंधरा खासगी डिझेलच्या बसेस आहेत यामुळे सीएनजी बसेसची वाढती संख्य लक्षात घेता रायगड जिल्ह्यात आणख काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून केल जात आहे. महाड आगारातील सीएनज पंपावरील सीएनजी गॅस संपल्याने काह काळ प्रवाशांचा संताप पाहावयास मिळाला यावेळी संतप्त प्रवाशांनी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली. सीएनजी गॅसवाबत परिवहन मंडळाने याची पूर्वतयारी करणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे न घडल्या आम्हाला विनाकारण अडकून पडावे लागले, अशी प्रतिक्रियाही अनेक चाकरमान्यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यात पेणनंतर थेट महाड
सीएनजी पुरवणारी वाहने अडकली वाहतूककोंडीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे सीएनजी घेऊन येणाऱ्या गाड्या पेट्रोलपंपापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक खाजगी पंपमालकांनादेखील ऐन हंगामाच्या वेळेतच आपले पंप बंद ठेवावे लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे व प्रचंड प्रमाणातील वाहतूककोंडीचा यंदाही चाकरमान्यांना मोठा फटका बसला असून सरकारचे सर्वच दावे पोकळ ठरले आहेत.