बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. तो मिळवण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत असून एसआयटीच्या प्रमुख आरती सिंहही बदलापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या आहेत. नराधम अक्षयचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने अक्षयला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईसह राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापुरातील शाळकरी चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी तपासासाठी राज्याच्या गृहखात्याने एसआयटीची स्थापना केली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी अक्षय शिंदे याच्यासोबत शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि अक्षयला बदलापूरमध्ये ठिकठिकाणी फिरवले.
कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाल आणि आपटे फरार झाले तर अर्चना आठवले एसआयटीला शरण आल्या. मात्र गुन्हा दाखल होऊन 14 दिवस उलटले तरी फरार झालेल्या उदय कोतवाल आणि तुषार आपटे पोलिसांना सापडत कसे नाहीत, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
अक्षयला बदलापूरमध्ये ठिकठिकाणी फिरवले
दरम्यान या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला अक्षय शिंदे याचा मोबाईल शोधण्यासाठी एसआयटीने त्याला बदलापूरमधील वेगवेगळ्या भागात फिरवले. त्याने हा मोबाईल नेमका कुठे टाकला याचा कसून तपास सुरू आहे. हा मोबाईल शोधण्यासाठी आणि त्याने आणखी किती मुलींचे लैंगिक शोषण केले आहे याची चौकशी करण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.