अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत गोखले पुलावर 25 मीटर तुळई सरकवण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली आहे. एकूण 86 मीटर तुळई सरकवणे आवश्यक असून त्यापैकी 25 मीटर तुळई सरकवण्यात आली आहे. पुढील रेल्वे मेगाब्लॉक मिळाल्यानंतर उर्वरित काम करण्यात येईल.