पुणे-पिंपरी येथील बँकेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याने मुंबईतील अटलसेतुवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे.ॲलेक्स रेगी (35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पिंपरीतील एका बँकेत व्यवस्थापक पदावर काम करणारे ॲलेक्स रेगी (35) हे कामानिमित्ताने सोमवारी मुंबईत आले होते. मुंबईतील काम संपल्यावर रेगी आपल्या चेंबूर येथील सासुरवाडीतही गेले.त्यानंतर अटलसेतुवरुन ते पुण्याच्या परतीच्या मार्गाला निघाले होते.पुण्याला परत जात असताना अटल सेतूवरु त्यांनी आपली गाडी थांबवली. यानंतर गाडीतून उतरुन थेट अटल सेतूवरुन खवळलेल्या समुद्रात उडी मारली.
दरम्यान अटल सेतूवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून मॉनिटरिंग करणाऱ्या पथकाने कार थांबलेली पाहिली. त्यामुळे त्यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच त्याने अटलसेतूवरुन समुद्रात उडी घेतली. पोलिसांच्या गस्ती पथकाने ॲलेक्स रेगी यांचा मृतदेह शोधून काढला आहे.आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेत असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.