पावसाचा वाढता जोर पाहता राज्यांतील प्रमुख धरणांचा पाणीसाठा तब्बल 82.24 टक्क्यांवर गेला आहे. मागच्या वर्षात या राज्यात जलसाठा 64.76 टक्क्यांवर होता.
राज्यात वाढत्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथळी भरुन वाहत आहे , दरम्यान राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मराठवाड्यासह विदर्भलाही पावसाचा फटका मराठवाड्यातील जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाने धूमाकुळ घातला आहे. बुलढाणा, हिंगोली, परभणीलाही मुसळधार पावसाने झोडपलं आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोयनेसह उजनी धरणातही 100 टक्के वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर कायम असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज संपूर्ण राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. सनासुदीच्याा तोंडावर पावसामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांनी उभं केलेलं पीक क्षणभरात नष्ट होणं हे सहन करण शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे.
कोणत्या विभागात किती पाणीसाठा ?
नागपूर विभाग – 82.36 टक्के
अमरावती विभाग – 84.64 टक्के
मराठवाडा – 62.21 टक्के
नाशिक – 76.67 टक्के