महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटने अटक केली. पंकज ढोलकीया असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले होते.

गेल्या महिन्यात तक्रारदार महिला या अंधेरी येथून प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान पंकज ने त्याना नकोसा स्पर्श करून पळ काढला होता. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून अंधेरी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास रेल्वे गुन्हे शाखेचे वांद्रे युनिट करत होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.

वांद्रे युनिटचे सहायक निरीक्षक अभिजित टेलर आदीच्या पथकाने तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटजेनंतर पोलिसांचे पथक सुरत येथे गेले. सुरत येथे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने फिल्डिंग लावून ढोलकीयाच्या मुसक्या आवळल्या.

ढोलकीया हा मूळचा सुरतचा रहिवासी आहे. तो पूर्वी मुंबईत एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचे. ऑगस्ट महिन्यात गोरेगाव येथे प्रदर्शन भरले होते. तेव्हा तो तेथे आला होता. राम मंदिर येथून तो ट्रेनने अंधेरी येथे यायचा. सायंकाळी गर्दीचा फायदा घेऊन तो महिलांच्या घोळक्यात घुसायचा. त्यानंतर तो महिलांचा विनयभंग करायचा.