भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी अनोखे आंदोलन, पाहा व्हिडीओ

भ्रष्टाचाराविरोधात्ा कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एका व्यक्तीने गळ्यात कागदपत्रांची भली मोठी माळ घालून अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून सरपटत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर डोक्यावर चप्पल ठेवून या व्यक्तीने मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे न्याय देण्याची विनंती केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुकेश प्रजापती असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी अनेक वर्षांपूर्वी माजी जिल्हा कंचायत सीईओविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा निषेध म्हणून या व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले. या व्यक्तीने गळ्यात एक हजार पानांची तक्रार माळ घातली होती. रस्त्यावरून सरळ न जाता सरपटत जात कलेक्टर ऑफिस गाठले. या ठिकाणी जिल्हाधिकाऱयांनी मुकेश प्रजापती यांचे सर्व म्हणणे ऐकून घेत लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले.