हायब्रिड कारवर 48 टक्के, तर इलेक्ट्रिक कारवर 5 टक्के जीएसटी बराच काळ राहणार, कार कंपन्यांना दिलासा मिळणे मुश्कील

हायब्रिड कार आणि इलेक्ट्रिक कारवरील लावलेला जीएसटी कमी करावा अशी मागणी मारुती सुझुकी व टोयोटा किर्लोस्कर या प्रमुख कंपन्यांनी केली आहे. परंतु हायब्रिड कारवर लावलेला 48 टक्के जीएसटी आणि इलेक्ट्रिक कारवर लावलेला 5 टक्के जीएसटी सध्या तरी कमी करण्यात येण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसत असून हा जीएसटी कर आगामी काळात बराच काळ असाच राहू शकतो, असा अंदाज जी-2 चे शेरपा अमिताभ कांत यांनी वर्तवला आहे.

अमिताभ कांत यांनी मर्सिडीज-बेंज सस्टेनेबिलिटी डायलॉग इंडिया 2024 च्या एका पॅनेलीशी चर्चा करतानाही ही माहिती दिली. आमच्याकडे एक आलेख आहे. याअंतर्गत हायब्रिड कारवर 48 टक्क्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारवर केवळ 5 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे हा कर बराच काळ असाच राहू शकतो. आम्ही हिंदुस्थानात खूप मोठय़ा प्रमाणात बॅटरी तयार करण्याला प्रोत्साहन देतो. हिंदुस्थानला 2070 पर्यंत कार्बनमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.