जमिनीवरून लांब पल्ल्यापर्यंत हल्ला चढवणाऱया आणि रडारला गुंगारा देण्याची क्षमता असलेल्या निर्भय क्रूझ मिसाईलचे पहिले व्हर्जन यशस्वी झाले आहे. त्यानंतर डीआरडीओ आता निर्भय क्रूझ मिसाईलची नौदल आवृत्ती विकसित करतेय. यामुळे निर्भय क्रूझ मिसाईल पाणबुडीवरून थेट शत्रूवर हल्ला चढवेल. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेल्या या मिसाईलने नौदलाची ताकद वाढणार आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) निर्भय क्रूझ मिसाईल आता पाणबुडीवर लॉन्च करणार आहे. नौदलासाठी हे एक महत्त्वपूर्ण शस्त्र ठरू शकेल. हिंदुस्थानची लष्करी ताकद वाढवण्यासाठी निर्भय क्रूझ मिसाईल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– निर्भय क्रूझ मिसाईल पाणबुडीवर लॉन्च केले जाऊ शकते.
– हे मिसाईल दोन प्रकारचे असते. लँड अटॅक क्रूझ मिसाईल आणि ऑण्टिशिप क्रूझ मिसाईल.
– पाणबुडीवरील शस्त्रास्त्रांच्या पॅकेजमध्ये हे मिसाईल असेल. त्याची रेंज एक हजार किलोमीटरपर्यंत वाढवता येईल.
– निर्भय क्रूझ मिसाईल समुद्रावरून फार कमी उंचीवर उडवले जाईल. शत्रूच्या रडारला गुंगारा देऊ शकते. मिसाईल 500 मीटर ते चार किलोमीटरच्या उंचीवर उड्डाण घेईल.
नौदलाच्या ताफ्यात सात युद्धनौका
येत्या काळात नौदलाच्या ताफ्यात आणखी सात युद्धनौका येणार आहेत. 17 ब्राव्हो प्रोजेक्टमधील या युद्धनौका आहेत. डीसीएच्या बैठकीत निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत टी- 72 रणगाडय़ांना अपग्रेड करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. टी- 72 रणगाडे एफआरसीव्हीमध्ये रूपांतरित केले जातील. आतापर्यंतच्या सर्कात हायटेक अशा हेरगिरी करणाऱया युद्धनौकांची निर्मिती केली जात आहे.
600 रणगाडे नवीन रूपात
टी- 72 रणगाडय़ांना एफआरसीव्ही म्हणजे फ्युचर रेडी कॉम्बॅट वेईकल्समध्ये रूपांतरित केले जाणार आहे. एफआरसीव्ही प्रोजेक्ट काही टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाईल. प्रत्येक टप्प्यात 600 रणगाडय़ांना अपग्रेड करण्यात येईल. एफआरसीव्ही प्रोजेक्टसाठी 50 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.