मुस्लिम वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द, पुन्हा तुरुंगात होणार रवानगी

गोमांस असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी एका 72 वर्षीय मुस्लिम वृद्धाला मारहाण केली होती. आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली होती पण 24 तासांत त्यांना जामीनही मिळाला होता. आता तक्रारीत नव्याने कलम टाकल्याने या आरोपींची तुरुंगात रवानगी होणार आहे.

जळगावचे रहिवासी असलेले अशरफ अली सय्यद हुसैन हे धुळे मुंबई एक्सप्रेसने कल्याणला जात होते. तेव्हा आकाश आव्हाड, नितेश अहिरे आणि जयेश मोहिते या तीन तरुणांनी हुसैन यांना हटकलं. तुमच्या पिशवीत काय आहे अशी विचारणा केली. तेव्या बरणीतहून हुसैन हे म्हशीचे मांस घेऊन जात होते. पण हे गोमांस आहे असा आरोप या तीन तरुणांनी केला. तसेच हुसैन यांना मारहाणही केली. त्यात हुसैन गंभीर जखमी झाले. या तरुणांनी या घटनेचा व्हिडीओही शुट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

रेल्वे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण रेल्वेत बसण्याचा जागेवरून वाद झाला असे म्हणत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे 24 तासांत या तरुणांना जामीन मंजूर झाला आणि ते तुरुंगातून सुटले. त्यानंतर हुसैन यांनी माहिती दिल्यानंतर चोरी आणि धार्मिक भावना दुखावण्याचा आरोपासंदर्भातही या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने याचिका स्विकार केली आणि तरुणांचा अटकेचा मार्ग मोकळा झाला. पोलिस या तरुणांच्या घरी पोहोचले पण ते सापडले नाहित. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.