वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील अमावस्येला राज्यभर बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
2 सप्टेंबर रोजी अखेरच्या श्रावणी सोमवारी शेतकरी बांधवांनी परंपरेने बैलपोळा सण साजरा केला. महाराष्ट्रासह छत्तीसगडमध्येही हा सण उत्साजात साजरा होतो.
परतूर सावरगाव बुद्रुक ठाकूर येथे शेतकरी बांधवांनी बैलांची पूजा करीत सजवलेल्या बैलांची गावांतून मिरवणूक उत्साहात काढली. यावेळी बैलांना पुराणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला.
आंबेगाव तालुक्यातही बैलपोळा उत्साहात साजरा झाला. जिल्ह्यात सर्वात मोठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या असलेल्या महाळुंगे पडवळ येथील बैलपोळा मिरवणुकीत तब्बल 150 हून अधिक बैल सहभागी झाले होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात येणाऱ्या वांबोरी येथे बळीराजाने बैलाला सजवून, औक्षण करून गोडधोड नैवद्य दाखवला.