जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच असून सुंजवान लष्करी तळावर आज सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नाईक कुलवंत सिंग हे शहीद झाले. त्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद मोडीत काढल्याचा मोदी सरकारचा दावा पुन्हा फोल ठरला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर सैनिक आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ड्रोन आणि प्रशिक्षित श्वानांसह शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला नसल्याचा खुलासा संध्याकाळी लष्कराने केला.
n पाच दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. 29 ऑगस्ट रोजी कुपवाडा येथे चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते. 14 ऑगस्ट रोजी डोडा येथील चकमकीत पॅप्टन दीपक सिंह शहीद झाले होते. 16 जुलैला देसा येथे चकमकीत पॅप्टनसह 5 जवान शहीद झाले होते.