सध्या 35 ते 40 या वयातील तरुणांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी वयात तरुण विसरभोळे होत असून तरुणांमध्ये व्हॅस्कूलर आणि अल्झायर डिमेंसिया आजार मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. हा आजार नेमका कशामुळे होत आहे हे जाणून घेण्यासाठी हजारो तरुणांनी सध्या डॉक्टरांकडे धाव घेतली आहे. 35 ते 40 या वयातील तरुण सतत ताण घेत आहेत. एकाच वेळी अनेक कामांत लक्ष देणे, पुरेशी झोप न घेणे, रात्रभर जागरण करणे यांसह अन्य काही कारणांमुळे तरुणांना विस्मरणाचा आजार वाढला आहे. खराब अन्न, पुठल्या तरी फुटकळ गोष्टींची चिंता, जास्त वेळ मोबाईल आणि सतत लॅपटॉपवर काम करत राहिल्याने मेंदूच्या नसांवर ताण पडल्याने कमी वयात स्मृतिभ्रंश होत आहे. यामुळेच कमी वयात मुलांना ब्रेन स्ट्रोकसुद्धा येत आहेत. खराब जीवनशैलीमुळे तरुण सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. 35 ते 40 या उमेदीच्या काळात त्यांना वृद्धापकाळाच्या आजाराने ग्रासले आहे. मेंदूला विश्रांती कमी मिळत असल्याने मेंदूच्या नसांमध्ये अमॉइलाइट प्रोटिन जमा होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होत आहे.